Wednesday, November 12, 2025
Homeमहाराष्ट्रअखेर चौथी, सातवी शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम आला

अखेर चौथी, सातवी शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम आला

वर्षीपासून चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर झाली आहे. पण ही कूस पालटताना आता चौथी व सातवीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागू नये म्हणून केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षात चौथी, पाचवी, सातवी व आठवी या चार वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे.

 

याबाबत पाचवी, आठवीचा प्रश्न नव्हता. पण चौथी व सातवीसाठी परीक्षा जाहीर झाली. परंतु अभ्यासक्रमच नव्हता. अखेर सत्र संपल्यानंतर हा अभ्यासक्रम आला आहे. याबाबत दै. ‌’पुढारी‌’मध्ये 2 नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. दीडशे गुणांचे हे 2 पेपर असणार आहेत.

 

शिक्षणाची गुणवत्ता मोजण्याचा एक महत्त्वाचा मानक म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा होय. पूर्वीपासून चौथी व सातवीसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा होती. मात्र 2016 पासून ही परीक्षा पाचवी व आठवी वर्गासाठी सुरू करण्यात आली. पण आता शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञ, शिक्षक संघटना यांनी ही परीक्षा पूर्ववत चौथी व सातवीलाच सुरू करावी कारण आठवीचा वर्ग हा हायस्कूलला जोडलेला असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाच्या मूल्यमापनासाठी ही परीक्षा चौथी, सातवीलाच आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले. शासनाने देखील याबाबत निर्णय घेऊन चौथी सातवीला शिष्यवृत्ती सुरू केली. मात्र हा निर्णय जाहीर करण्यास खूप उशीर लावला. म्हणजे एक सत्र संपून शाळांना दिवाळी सुट्टी सुरू झाली होती. मुळात उशिरा ही परीक्षा जाहीर झाली. पण त्याचा अभ्यासक्रम जाहीर झालाच नाही. दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा अभ्यासक्रम परीक्षा परिषदेने जाहीर केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -