Wednesday, January 14, 2026
Homeकोल्हापूरवनरक्षकाच्या अंगावर चढला आणि… कोल्हापूरच्या नागरी वस्तीतला बिबट्याचा थरार VIDEO मध्ये कैद!

वनरक्षकाच्या अंगावर चढला आणि… कोल्हापूरच्या नागरी वस्तीतला बिबट्याचा थरार VIDEO मध्ये कैद!

कोल्हापूरच्या नागरीवस्तीत बिबट्याचा(leopard) वावर पाहायला मिळतोय. बागकाम करणा-या एका नागरिकावर बिबट्याने हल्ला चढवलाय. यानंतर महावितरणाच्या कार्यालयात बिबट्या लपला होता. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम दाखल झाली. हा थरार व्हिडीओमध्ये कैद झालाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.कोल्हापूर शहराच्या विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हॉटेलमध्ये घुसून बिबट्याने दोघांवर हल्ला केला असून, त्यात एक वनरक्षक जखमी झालाय.

 

बिबट्या शहराच्या भरवस्तीत, विशेषतः ताराबाई पार्क आणि नागाला पार्क परिसरात आढळून आला आहे. वनविभाग आणि पोलीस विभाग बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यापूर्वी, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.

 

रात्री 11 वाजता मेरी वेदर ग्राउंड वर दिसला. त्यांनतर सकाळी 11 वाजता विवेकांनंद कॉलेज परिसरात दिसला.11.30 वाजता होटल वुडलँड होटल परिसरात माळ्यावर हल्ला झाला..त्यानंतर महावितरण कार्यालय पिछाडीस असणाऱ्या भागात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला.त्यांनतर हा बिबट्या (leopard)महावितरण कार्यालयाच्या पिछाडीस असणाऱ्या नाल्यात जावून बसला. पन्हाळा किल्ल्याच्या आसपासच्या परिसरातही बिबट्याचा वावर वाढला असून, वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनांमुळे कोल्हापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम आहे. नागरिकांनी रात्री घराबाहेर एकटे पडणे टाळावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -