शहापूर पोलिसांनी सोमवारी रात्री एका 60 वर्षीय महिलेकडून पाव किलो गांजा (ganja)जप्त केला आहे. लक्ष्मी आनंदा गुरव (वय 60, रा. जी. के. नगर, तारदाळ) असे या महिलेचे नाव असून, तिच्यावर गेल्या सव्वा वर्षात ही दुसरी कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.ही कारवाई सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांना माहिती मिळाली होती की, लक्ष्मी गुरव ही आपल्या राहत्या घरात गांजाची(ganja) विक्री करते. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता, एका प्लास्टिकच्या पिशवीत सुमारे 8 हजार 190 रुपयांचा, 273 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. या गांजामध्ये हिरवट पाने, फुले, काड्या व बिया आढळून आल्या असून त्याला उग्र वास येत होता.
गांजासह संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी पुढील तपास शहापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. स्थानिक परिसरात या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अवैध अंमली पदार्थ विक्रीविरोधात मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.



