बहाव ता. शिरोळ येथे पड़ावकडीचे मार्गावरीलक्षणावर सिमेंटच्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार चंद्रकांत सुरेंद्र किणींग (वय ५५, रा. सुचना, ता. शिरोळ) है जागीच ठार झाले. या अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले आहे. या अपघाताची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
चंद्रकांत किपिंगे शुक्रवारी सायंकाळी पार्वती औद्योगिक वसाहत कार्यालयातील काम झाल्यावर दुचाकी (क्र. एम. एच. ०१ ३.१. ६४३८) वरून घरी निघाले होते. बंधर वसाहत रस्त्यावरील वळणावर सिमेंटच्या ट्रक (क्र. के.ए. ४८९१४३५) ने फिगि वांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही इनकी जोराची होती की, किणीत यांचे हेल्मेट फुटून ते जागीच ठार झाले. दुचाकीस्वार रक्ताच्या चारोळ्यात पडल्याचे पाहून अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन करते घटनास्थळी किली बांचे नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आयजीएम रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. किमिगे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून असा परीवार आहे.




