Friday, January 30, 2026
Homeअध्यात्म31 डिसेंबर 2025 शेवटच्या दिवशी करा स्वामी समर्थांची ही सेवा : नवीन...

31 डिसेंबर 2025 शेवटच्या दिवशी करा स्वामी समर्थांची ही सेवा : नवीन वर्षात कोणतीही अडचण येणार नाही

मित्रांनो अगदी काही दिवसातच आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे येणारे नवीन वर्ष हे 2026 आपल्याला सुखकर जावे आपणाला या वर्षात कोणत्याही अडचणी येऊ नये. आपल्या आरोग्य चांगले राहावे आपल्या कुटुंबाचे चांगली संरक्षण व्हावे. आणि आपण करत असलेल्या नोकरी व्यवसायात चांगली भरभराटी यावी. यासाठी आज आपण येथे एक सेवा पाहणार आहोत.

आता 2025 हे वर्ष संपण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर अगदी जवळच आहे तर या दिवशी म्हणजे वर्षाच्या या शेवटच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे. या दिवशी ही सेवा आपण 31 डिसेंबरच्या सायंकाळी करायचे आहे. ती कशी करायची आणि ती कोणती सेवा हे आता आपण जाणून घेऊ

मित्रांनो यासाठी आपण ही सेवा करताना सुरुवातीला आपले हात पाय स्वच्छ धुवून आपल्या देवघरासमोर किंवा जिथे आपले देव असतील त्या ठिकाणी बसायचे आहे अगदी आपण देवपूजेला वस्तू त्याप्रमाणे… आणि यानंतर आपली जे काही देव असतील त्या सर्व देवांची नावे घेऊन मनोभावे अशी प्रार्थना करायचे आहे

ती म्हणजे नुकताच संपत आलेली 2025 वर्ष हे आपणाला जसे गेले त्यापेक्षा अधिक चांगल्या पटीने नवीन वर्षी येऊ दे येणाऱ्या वर्षात आपले तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहू दे. आपल्यावर तसेच आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या घरावर येणारे जे काही संकट असेल ते दूर व्हावे.

आपल्याबरोबरच आपल्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती व्हावी लहान मुलांची शैक्षणिक तसेच आरोग्याची तर घरातील वृद्धांची आरोग्याची चांगली प्रगती होऊ दे. आम्ही करत असलेल्या नवीन प्रयत्नांना यश मिळू दे. अशा प्रकारची प्रार्थना मनोभावी करायची आहे. यानंतर स्वामींची सेवा म्हणजे खालील प्रमाणे करायचे आहे.

वरील सेवा झाल्यानंतर आपणाला श्री स्वामी समर्थ नावाचा जप एक माळ करायचा आहे. हा मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पुस्तकातून श्री सूक्त एक वेळेस वाचायचा आहे आणि पुरुष सूक्त एक वेळ वाचायचा यानंतर राम रक्षा एक वेळ वाचत आहे आणि यानंतर तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे.

अशी सेवा आपणाला 31 डिसेंबर म्हणजे वर्षातील शेवटच्या दिवशी करायचे आहे. आणि आपल्या प्रगतीसाठी तसेच आपल्या घरातील सदस्यांचे प्रगतीसाठी आरोग्यासाठी आपणा असणाऱ्या सर्व देवी देवतांकडून आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्याचबरोबर स्वामी पुढे आपले सर्व म्हणणे मांडून येणाऱ्या नवीन वर्षात सुख समाधान राहण्याचे मागणी करायचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -