Friday, January 30, 2026
Homeइचलकरंजीचार वर्षे गायब, निवडणुकीत हजर! इचलकरंजीत अचानक समाजकारण करणाऱ्या नेत्यांवर संताप

चार वर्षे गायब, निवडणुकीत हजर! इचलकरंजीत अचानक समाजकारण करणाऱ्या नेत्यांवर संताप

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय आणि (directed) सामाजिक हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत, मात्र चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या प्रश्नांसाठी फारसे कोणी पुढे आले नव्हते.त्यावेळी प्रभागाची आठवण झाली नाही का? अशी तीव्र भावना शहरात उमटताना दिसून येत आहे. चार वर्षांपासून महापालिकेवर प्रशासकाची कारकीर्द सुरू असल्याने शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी प्रशासनाकडे होती.मात्र, या काळात खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, तुंबलेली ड्रेनेज व्यवस्था, वाढता कचरा, बंद पडलेले पथदिवे अशा मूलभूत समस्यांनी नागरिक हैराण झाले. लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांना छोट्या छोट्या प्रश्नांसाठीही स्वतः महापालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या.लेखी तक्रारी करूनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची भावना नागरिकांत होती.मात्र आता निवडणुकांची चाहूल लागताच चार वर्षे प्रभागात न फिरकलेले अनेक इच्छुक उमेदवार अचानक सक्रिय झाले आहेत.

 

खड्डे, कचऱ्याचे ढिगारे, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी अशा प्रत्येक (directed) समस्यांवर हजेरी लावत संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून काम तत्काळ करा, अशा सूचना देतानाचे दृश्य शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.तर काही इच्छुक उमेदवार या भेटीगाठी, फोन कॉल्स आणि चर्चांचे व्हिडिओ सोशल मीडियावर झळकावत आहेत. आपणच किती कार्यक्षम आहोत आणि प्रश्न आम्हीच सोडवतो. असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे, मात्र चार वर्षांत गंभीर समस्या निर्माण झाल्या असताना हे कुठे होते?. असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहेत.इचलकरंजीतील जवळपास सर्वच प्रभागांत हेच चित्र दिसून येत आहे. रस्त्यांची दुरवस्था, तीव्र पाणीटंचाई, सांडपाण्याचे प्रश्न ऐरणीवर असताना एकदाही न दिसणारे नेते आज अचानक समाजकार्यासाठी पुढे येताना दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -