राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -



