Wednesday, February 25, 2026
Homeमहाराष्ट्र१० बिअर पिल्या.. ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या! नर्सने बोलणे बंद केल्याने प्रेमवेड्या...

१० बिअर पिल्या.. ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या! नर्सने बोलणे बंद केल्याने प्रेमवेड्या डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरने प्रेमप्रकरणातून स्वतःचे आयुष्य संपवण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. प्रेयसी असलेल्या नर्सने बोलणे बंद केल्याच्या नैराश्यातून या डॉक्टरने तब्बल १० बिअर रिचवून आणि झोपेच्या ४५ गोळ्या खाऊन मृत्यू गाठण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने या डॉक्टरचे प्राण वाचले असून सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

 

नेमकी घटना काय?

 

डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे डॉक्टर दाम्पत्य वास्तव्यास असून त्यांचे स्वतःचे मोठे हॉस्पिटल आहे. गेल्या दोन दिवसांपासून डॉक्टर हॉस्पिटलमध्ये न आल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन उचलला जात नसल्याने कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा डॉक्टर बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेला आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

प्रेमाचा त्रिकोण

 

मिळालेल्या माहितीनुसार, या डॉक्टरांचे त्यांच्याच हॉस्पिटलमधील एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी डॉक्टरने डोंबिवली पूर्वेकडील एका सोसायटीत वेगळे राहण्यास सुरुवात केली होती.

 

विवाहित असूनही लग्नाचा तगादा

 

दुसरीकडे, संबंधित नर्सने डॉक्टरकडे लग्नासाठी तगादा लावला होता. ‘मी विवाहित असल्याने तुझ्याशी लग्न कसे करू?’ असा प्रश्न डॉक्टरने विचारल्यानंतर संतापलेल्या नर्सने त्याच्याशी बोलणे बंद केले. प्रेयसी नर्सने अबोला धरल्याने डॉक्टर मानसिक तणावात होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते आहे.

 

घटनास्थळी बिअरच्या बाटल्या आणि गोळ्यांचा खच

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरने घरात १० बिअरच्या बाटल्या रिकाम्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर झोपेच्या तब्बल ४५ गोळ्यांचे सेवन केले. घटनास्थळी पोलिसांना बिअरच्या रिकाम्या बाटल्या आणि गोळ्यांच्या रिकाम्या स्ट्रिप्स आढळून आल्या आहेत. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या असून तपास सुरू केला आहे.

 

पोलिस तपासाकडे लक्ष

 

संबंधित डॉक्टर सध्या कोमात असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तो पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतरच या प्रकरणाचा सविस्तर उलगडा होऊ शकणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. एका सुशिक्षित डॉक्टरने प्रेमाखातर घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -