Thursday, February 26, 2026
Homeइचलकरंजीपुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलच्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलच्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; कागलमोटार-दुचाकी अपघातात सोनगे (ता. कागल) येथील हा तरुण रामदास पाटील जखमी झाला होता. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल सीमा तपासणी नाक्याजवळ सोमवारी दुपारी साडेचार वाजता हा अपघात झाला.

रामदासला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी, येथील रामदास पाटील आणि विजय लोहार हे मोटारसायकलवरून कागलहून निपाणीच्या दिशेने चालले होते.

कागल सीमा तपासणी नाक्यासमोर आले असता येथील व्यवस्थेने केलेल्या जाण्याच्या मार्गात त्यांची मोटारसायकल व मोटार यांच्यात अपघात होऊन मोटारसायकलसह ते गटारीत जाऊन पडले. या अपघातात पाटील यांच्या डोक्याला मोठा मार लागला.

त्यांना उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरम्यान रामदास पाटील (वय ३६) यांचा मृत्यू झाला, तर विजय लोहार किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पाटील यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आई-वडील,भाऊ असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -