Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रहौसेनं Swift घेतली अन् दर्शनाला जात होते, पण नियतीचा क्रुर खेळ; एकाच...

हौसेनं Swift घेतली अन् दर्शनाला जात होते, पण नियतीचा क्रुर खेळ; एकाच घरातले 6 जण जागेवरच गेली, VIDEO

अहिल्यानगरमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. १० दिवसांपूर्वी घेतलेल्या कारमधून सगळे जण देव दर्शनाला गेले असता एका कुटुंबावर काळाने घातला. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

मृतांमध्ये एका ३ वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. तर आणखी एक चिमुरडा गंभीर जखमी असून उपचार सुरू आहे. या घटनेमुळे श्रीरामपूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिह्यातील श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात श्रीरामपूर इथं राहणाऱ्या चव्हाण कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश आहे. चव्हाण कुटुंबाने १० दिवसांपूर्वी मुंबई पासिंगची MH-03-AF-0054 क्रमांकाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार विकत घेतली होती. घरी कार आल्यामुळे चव्हाण कुटुंबाने आज श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा इथं गणपती दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं.

 

[/video]

 

कार आणि ट्रकची धडक

 

दुपारी चव्हाण कुटुंबीय मारुती सुझुकी स्विफ्टने गणपती दर्शनासाठी खंडाळ्याकडे निघालं. पण, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ पोहोचले असताना समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक आणि कारची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, मारुती सुझुकी कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. कारचं इंजिन फुटलं आणि कार रस्त्याच्या खाली फेकली गेली. अपघातात कारचा फक्त मागील भागच शिल्लक राहिला होता.

 

कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

 

धक्कादायक म्हणजे, मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जण बसले होते. या कारमध्ये एकूण ७ जण प्रवास करत होते. यामध्ये प्रशांत रमेश चव्हाण (वय 24), संगीता अनिल चव्हाण (वय 40), सिद्धार्थ सुनील चव्हाण (वय 16), सारिका अनिल चव्हाण (वय 30), ऋत्वी अशोक चव्हाण (वय 3) आणि ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय 26) अशी मृतांची नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींनाा तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या अपघातात सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहे.

 

अपघातातातील मृतांची नावं

 

प्रशांत रमेश चव्हाण (वय 24)

संगीता अनिल चव्हाण (वय 40)

सिद्धार्थ सुनील चव्हाण (वय 16)

सारिका अनिल चव्हाण (वय 30)

ऋत्वी अशोक चव्हाण (वय 3)

ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय 26)

जखमी : रुद्र अशोक चव्हाण (वय 6) – गंभीर जखमी, लोणी येथे उपचार सुरू

 

एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे श्रीरामपूरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चव्हाण कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -