रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्डच्या नियमात (cancelled) महत्त्वाचे बदल होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डचे नियम बदलणार आहेत. यामध्ये लाखो रेशन कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांचे नावदेखील काढून टाकले जाणार आहे.नवीन नियमांनुसार, रेशन कार्डची पात्रता आणि निकष अजूनच कडक करण्यात आले आहेत. याद्वारे फक्त निकषात बसणाऱ्या रेशन कार्डधारकांनाच मोफत धान्य मिळणार आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्डबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे.(cancelled) यामध्ये पारदर्शकता वाढवण्यात आली आहे. गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या व्यक्ती निकषात बसत नाही, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे.रेशन कार्डच्या नवीन नियमानुसार शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा ३ लाख निश्चित करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागासाठी २ लाखांची मर्यादा आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही.
ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे. १०० चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट, (cancelled) प्लॅट किंवा स्वतःचे घर असेल तर तुम्ही अपात्र आहात. घरातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे, घरात एसी किंवा जनरेटर असेल तर तुमचेही रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते.जर तुम्ही चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होई शकते. या रेशन कार्डधारकांना खरी कागदपत्रे जमा करायची आहे. याचसोबत केवायसी करणेही अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद केले जाणार आहे.







