Monday, March 2, 2026
Homeमहाराष्ट्रसरकारकडून मोठा दिलासा! मोफत गॅस सिलिंडर

सरकारकडून मोठा दिलासा! मोफत गॅस सिलिंडर

देशभरात होळीच्या तयारीला जोर लागलेला असताना, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

 

दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारने या सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरातील खर्च कमी करण्यासाठी मोफत गॅस सिलिंडर आणि आर्थिक मदतीची योजना जाहीर केली आहे.

 

दिल्ली सरकारने free gas cylinder scheme Delhi, गरीब व गरजू कुटुंबांना थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सिलिंडरच्या ऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ₹८५३ जमा केले जातील. यासाठी सरकारने साधारण ₹२४२ कोटींची तरतूद केली आहे. या योजनेचा फायदा राज्यातील जवळपास १.७५ कोटी रेशनकार्ड धारक कुटुंबांना मिळणार आहे. पाईपलाईन गॅस कनेक्शन असलेल्या कुटुंबांनाही या रकमेची थेट जमा केली जाईल.त्याचबरोबर, उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळीच्या सणांनिमित्त मोफत सिलिंडर रिफिलची व्यवस्था जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सुरुवातीला सिलिंडर स्वतः खरेदी करावा लागेल, त्यानंतर संपूर्ण रक्कम किंवा सबसिडी थेट त्यांचे बँक खात्यात जमा केली जाईल. मात्र करदाते, सरकारी कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेतून लाभ मिळणार नाही.सरकारी अधिकृत वेबसाइट्सवर अधिक माहिती उपलब्ध असून, लाभार्थ्यांनी आपले रेशनकार्ड तपासून योग्य अर्ज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे होळीच्या सणात लाखो कुटुंबांना आर्थिक ताण कमी होऊन आनंदात सण साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -