Tuesday, March 17, 2026
Homeमहाराष्ट्रपेट्रोलचे दर 500 रुपयांवर जाणार? युद्धामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणार?

पेट्रोलचे दर 500 रुपयांवर जाणार? युद्धामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणार?

जो दावा केलाय तो गंभीर आहे…युद्धामुळे पेट्रोलचे दर तब्बल 500 रुपयांवर जाणार (trigger)असल्याचा दावा केलाय…पण, खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई देशात निर्माण होऊ शकते का…? इराणने होर्मूझ जलमार्ग बंद केल्यामुळे हा परिणाम असल्याचा दावा केलाय…पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का…? आपल्या देशात पुरेसा इंधनसाठा नाही का…? कारण, गॅससाठी लोक रांगेत उभे आहेत…पुन्हा पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागल्या तर हाहाकार उडेल…महागाईचा भडका उडेल…त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे…

 

सध्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यायत…प्रति बॅलर (trigger) सुमारे 100 डॉलर इतकी किंमत आहे…आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने इंधनाचे दर वाढतात…आर्थिक तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत 10 डॉलर प्रति बॅरल वाढ झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अंदाजे 5-6 रुपये वाढ होऊ शकते…हा थेट परिणाम नेहमीच पंपांच्या किमतींवर दिसून येत नाही…कारण सरकार आणि तेल कंपन्या अनेकदा किमती नियंत्रित करतात…पण, खरंच आता पेट्रोल 500 रुपयांवर जाऊ शकतं का…? याची आम्ही पडताळणी करण्यासाठी काही ऑईल कंपन्यांच्या वेबसाईट पाहिल्या…मात्र, आम्हाला अशी कुठेही माहिती मिळाली नाही…त्यामुळे एक्सपर्टकडून अधिक माहिती जाणून घेतली… त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात…

 

पेट्रोलच्या किंमती 500 रुपयांवर जाणार ही अफवा

 

भारताकडे अनेक महिने पुरेल इतका साठा उपलब्ध

 

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा साठा उपलब्ध

 

पुढील काही दिवसातच LPGचा साठा सुद्धा सुरळीत होईल

 

 

तरी देखील भारतात पेट्रोलचा दर कसा ठरवला जातो…त्यावर एक नजर टाकूयात…

 

कसा ठरवला जातो पेट्रोलचा दर?

 

मुंबईतील दर-करांचं विभाजन

 

डीलरला आकारलेली मूळ (trigger) किंमत- 56 ते 58 रु.प्रति लिटर

 

केंद्रीय उत्पादन शुल्क- 19.90 रु. प्रति लिटर

 

डीलर कमिशन- 3.80 ते 7.78 रु. प्रति लिटर

 

एकूण व्हॅटची रक्कम- 21.16 ते 21.26 रु. प्रति लिटर

 

पेट्रोलची किंमत 103.54 रुपये प्रति लिटर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -