Saturday, March 21, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे...

राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता आहे. मात्र, शिक्षकांना यंदा या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

त्यामुळे उन्हाळाच्या सुट्ट्यात शिक्षकांना जनगनणेची कामं करावी लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी जनगणनेचं काम अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सुट्यांच्या काळात मुख्यालय सोडू नये, असे आदेशही दिले आहेत.

 

२०११ नंतर प्रथमच होत असलेल्या या जनगणनेअंतर्गत १६ मे ते १४ जूनदरम्यान घरांची मोजणी व यादी तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्यापूर्वी एप्रिल अखेरपासून मेच्या सुरुवातीपर्यंत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागणार आहे.

 

दरम्यान, या निर्णयानंतर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुलैमध्ये टीईटी परीक्षा होण्याची शक्यता असून जनगणना कामामुळे परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्याची भीतीही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे सुट्यांमध्ये जनगणेचं काम करणाऱ्या शिक्षकांना तेवढ्याच दिवसांची विशेष रजा दिली जाईल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र, यामुळे नव्या शैक्षणिक सत्राच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांचे मत आहे. घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्याच्या अटीमुळे विविध ठिकाणच्या दिव्यांग शिक्षक संघटनांनी या कामातून सूट देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनेही सादर करण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -