Saturday, April 4, 2026
Homeमहाराष्ट्र७१ लाख महिलांचा लाभ रद्द; लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांची जोरदार...

७१ लाख महिलांचा लाभ रद्द; लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

राज्यातील ‘लाडकी बहिण’ योजनेवरून पुन्हा एकदा राजकारण तापले असून सुषमा (serious allegations) अंधारे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना घाईघाईत राबवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.

 

अंधारे यांनी सांगितले की, (serious allegations) सुरुवातीला राज्यातील बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर नियमांमध्ये वारंवार बदल करण्यात आले. तीन वेळा पात्रतेत कपात करण्यात आल्यामुळे सुमारे २६ लाख महिला बाहेर पडल्या, तर त्यानंतरही तब्बल ७१ लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यावरही थेट निशाणा साधला. योजना जाहीर करताना श्रेय घेण्यासाठी पुढे येणारे मंत्री त्रुटी समोर आल्यावर मात्र मौन बाळगतात, अशी टीका त्यांनी केली. रद्द झालेल्या महिलांच्या सुमारे २५५ कोटी ६० लाख रुपयांची भरपाई कोण करणार, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

अंधारे यांनी पुढे म्हटले की, ही रक्कम सामान्य नागरिकांच्या करातून येते. (serious allegations) त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभार्थी वगळले जाणे ही गंभीर बाब आहे. इतर प्रकरणांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल होतात, तर या प्रकरणात संबंधितांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही लक्ष्य करत अंधारे यांनी ७१ लाख महिलांचे पैसे रद्द का करण्यात आले आणि त्याची जबाबदारी कोण घेणार, याचे स्पष्ट उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -