Monday, April 6, 2026
Homeमहाराष्ट्रअपहरणप्रकरणी चौघांना अटक

अपहरणप्रकरणी चौघांना अटक

हमिदवाडा येथील राजेंद्र रामगोंडा जत्राटे यांचे शुक्रवारी सायंकाळी खंडणीसाठी अपहरण झाले होते. याप्रकरणी महिलेसह चौघांना कोगनोळी टोल नाक्याजवळ अटक करण्यात आली. प्रवीण कांबळे (सरवडे), अतुल चांदणे (बेलेवळे बुद्रक), हिमांशी यादव (रा.सांगवडे) व दत्तात्रय जोतिराम इंगळे (वय 24, रा. बेलवळे बुद्रुक)अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि 7 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी तिघेजण फरार आहेत .

 

राजेंद्र जत्राटे यांचे खंडणीसाठी शुक्रवारी (दि. 3 ) सायंकाळी 5 च्या सुमारास गावातून अपहरण करण्यात आले. त्यांचा मुलगा प्रमोद याने रात्री दहाच्या सुमारास मुरगूड पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुंडले यांनी सहकार्‍यांसमवेत जत्राटे यांचे मोबाईल लोकेशन शोधून काढले. शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास कोगनोळी टोल नाक्यावर प्रवीण कांबळे व अतुल चांदणे यांना दुचाकीवरून फिरताना पकडले. यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस उपनिरीक्षक कुंडले जखमी झाले. याप्रकरणी हिमांशी यादव हिलाही अटक झाली. चौथा संशयित दत्तात्रय इंगळे यास रविवारी अटक केली. याप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुंडले करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -