Saturday, April 11, 2026
Homeब्रेकिंगहेलिकॉप्टर अपघातावर भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?

हेलिकॉप्टर अपघातावर भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात टळला आहे. ते मुंबईवरून एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुण्याला निघाले होते, याचदरम्यान ही घटना घडली आहे. भुजबळ यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी वाहनांच्या पार्किंग क्षेत्रात उतरवण्यात आलं. सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झालेली नाहीये, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्वजण सुरक्षित आहेत. पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आता या घटनेवर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी छगन भुजबळ हे मुंबईवरून पुण्याकडे निघाले होते, याचदरम्यान ही घटना घडली आहे. पायलटनं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी वाहनांच्या पार्किंग क्षेत्रात उतरवलं, सुदैवानं मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. या अपघाताबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. हा अपघात वगैरे काही नव्हता, आम्ही सर्वजण सुरक्षित बाहेर आलो. काळजी करण्याचं कारण नाही, फक्त हेलिपॅड न दिसल्यामुळे पायलटनं कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया

 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या लोकांना सांगतो की अंधश्रद्धेपासून दूर राहा, म्हणजे असे बाबा निर्माण होणार नाहीत. जे खरात याच्या दुषकृत्यांमध्ये सामील आहेत. त्यांच्यावरती गेल्या सहा महिन्यापासून मुख्यमंत्र्यांचा वॉच आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. नाशिक जिल्हा या लोकांमुळे बदनाम होत आहे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यामुळे सध्या राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे. यावर देखील भुजबळांनी मोठं विधान केलं आहे. जी महिला या पदाला न्याय देऊन शकते, त्या महिलेला हे पद देण्यात यावं, असं यावेळी भुजबळ म्हणाले आहेत. नाशिकच्या वृक्षतोडीवरही त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. कुणीही झाडे न तोडता सगळी कामे करावीत अशा मताचा मी आहे, नवीन पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय वृक्षतोड करू नये, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -