Sunday, April 26, 2026
Homeमहाराष्ट्रदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी आता खासगीरित्या बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘फॉर्म नंबर १७’ भरावा लागणार आहे. (students) हा फॉर्म भरल्यानंतरच विद्यार्थ्यांना खाजगी उमेदवार म्हणून परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी नियमित पद्धतीने परीक्षा दिली नाही किंवा काही कारणास्तव नोंदणी झाली नाही, त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. बोर्डाच्या सूचनेनुसार, जून-जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. नोंदणी पूर्ण केल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळेल.

 

ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या पत्त्यानुसार जिल्हा, निवडलेले माध्यम आणि शाखेनुसार उपलब्ध शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांनी एक योग्य शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय निवडणे आवश्यक आहे. ही निवड केल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.

 

नोंदणी शुल्कही ऑनलाइनच भरावे लागणार असून, त्याची पावती विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल. नावनोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in चा वापर करणे आवश्यक आहे.

 

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, जे शाळाबाह्य विद्यार्थी आधी नोंदणी करू शकले नाहीत, त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या अटी आणि नियमांनुसार विद्यार्थ्यांना जवळच्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत नोंदणी करता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -