Wednesday, April 29, 2026
Homeमहाराष्ट्रराजा शिवाजी सिनेमाच्या नावात छत्रपती का नाही? रितेश देशमुख म्हणाला...

राजा शिवाजी सिनेमाच्या नावात छत्रपती का नाही? रितेश देशमुख म्हणाला…

अभिनेता रितेश देशमुख याचा ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रितेश-जेनिलियाचं स्वप्न होतं. त्यांनी या सिनेमासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली आहे.

 

दरम्यान या सिनेमात शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुख पहायला मिळणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा रितेश याने केलं आहे. तसंच निर्मिती ही जेनिलायने केली आहे.

 

दरम्यान आता या सिनेमाचं नाव ‘राजा शिवाजी’ असं का ठेवलं? नावामध्ये छत्रपती असा उल्लेख का करण्यात आला नाही? याबद्दल रितेशने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. तसंच या सिनेमातील अनेक शीर्षक आधीच नोंद करुन ठेवल्याचंही रितेशनं मुलाखतीत सांगितलं होतं.

 

मुलाखतीत बोलताना रितेश म्हणाला, ‘आम्ही या सिनेमासंबंधी अनेक शीर्षक नोंद करुन ठेवली होती. शिवछत्रपती शिवाजी महाराज, फक्त छत्रपती शिवाजी असे अनेक नावं आम्ही लिहली होती. या सिनेमातून महाराजांची संपूर्ण शौर्यगाथा दाखवणं शक्य नव्हतं. त्यातील एका भागावर आम्ही सिनेमा बनवायचं ठरवलं. तो भाग कोणता घ्यायचा? याचा विचार सुद्धा आवश्यक होता. त्यासाठी संपूर्ण इतिहासाचा अभ्यास केला. आम्ही जेव्हा महाराजांबद्दल वाचलं त्यावेळी आम्ही विचार केला की, महाराजांचे सख्खे थोरले बंधू संभाजी महाराजांविषयी लोकांना माहिती नाही. त्यांच्याबद्दल फार कुठे काही लिहिलेलं नाही. संभाजी महाराज शिवाजी महाराजांपेक्षा ८ वर्षांनी मोठे होते.’

 

पुढे बोलताना तो असही म्हणाला की, ‘ही गोष्ट महाराजांबरोबरच स्वराज्याच्या उभारणीची सुद्धा आहे. अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांची सर्वांना दखल घेतली. तोपर्यंत शहाजी राजेंचे पुत्र म्हणून शिवाजी महाराज माहित होते. शिवबा ते राजा शिवाजी असा हा प्रवास आहे. शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास पुर्णपणे वेगळा आहे. यात तो नाही. म्हणून मी अतिशय नम्रपणे सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा सिनेमा राजा शिवाजी आहे. छत्रपती नाही म्हणून अवमान नाहीय. शिवाजी महाराज आपल्यासाठी देवच आहेत. जसं आपण देवाला माझा विठ्ठल, माझा बाप्पा असं म्हणतो तशीच ही भावना आहे.’

 

दरम्यान राजा शिवाजी हा सिनेमा १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासिनेमात रितेश-जेनिलायासह अनेक मोठे कलाकार आहेत. सचिन खेडेकर, महेश मांजेकर, जितेंद्र जोशीसह बॉलिवूडमधील सलमान, अभिषेक बच्चन,संजय दत्त, फरदीन खान हे कलाकार पहायला मिळणार आहे. चाहत्यांना आता या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -