जैनापूर (ता. शिरोळ) येथील सरपंच तथा प्रशासक संगीता रमेश कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे (वय ३०, रा. जैनापूर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात (Kolhapur bribery case latest news) अडकले.
या दोघांविरोधात लाच मागितल्या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईनंतर मुलगा निकेत कांबळे याला जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रक्तदाब वाढल्याने सरपंच कांबळे यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.
या विभागाने दिलेली माहिती अशी : तक्रारदारास पत्नीच्या नावे शेडनेट व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला हवा होता. त्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज केला. यावेळी सरपंच कांबळे यांनी दहा हजारांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पथकाने याची पडताळणी केली असता दोघांनी नऊ हजार घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
या दोघांनी काम पूर्ण झाल्यावर पैसे द्या, असे म्हणत पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, पडताळणीमध्ये लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल झाला. कारवाई पथकात विभागाच्या कोल्हापूर उपअधीक्षक वैष्णवी पाटील, निरीक्षक उज्वला भडकमकर, सुनील मोरे, सुधीर पाटील, संगीता गावडे, संदीप पवार यांचा समावेश होता.
पद रद्द; पण…
सरपंच कांबळेंविरोधात १३ मे २०२५ रोजी अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतरच्या सरपंच निवडीत विरोधी सदस्यांकडे अनुसूचित जाती महिला सदस्य नसल्याने पुन्हा त्या सरपंच झाल्या होत्या.




