Tuesday, May 12, 2026
Homeमहाराष्ट्रसर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.एलपीजी सिलिंडरच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेले मोबाईल नंबर आता तात्काळ बदलता येणार नाहीत. पेट्रोलियम कंपन्यांनी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी एक नवीन प्रणाली लागू केली आहे.

 

एलपीजी सिलिंडरच्या नव्या नियमानुसार, गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेले मोबाईल नंबर लगेच बदलता येणार आहे. मोबाईल नंबर बदलण्यासाठी ९० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी आता बायोमेट्रिक पडताळणी आणि केवायसी प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

 

एलपीजी सिलिंडरच्या नव्या नियमानुसार, गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेले मोबाईल नंबर लगेच बदलता येणार आहे. मोबाईल नंबर बदलण्यासाठी ९० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी आता बायोमेट्रिक पडताळणी आणि केवायसी प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

 

पूर्वी ग्राहक गॅस एजन्सी किंवा पोर्टलद्वारे आपला मोबाईल नंबर तात्काळ अद्ययावत करू शकत होते. पण आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. नवीन नंबर पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागणार आहे. मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता बायोमेट्रिक पडताळणी आणि केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे बदल करणारी व्यक्ती खरीच आहे याची खात्री केली जाणार आहे.

 

नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः ज्यांना आपला नंबर त्वरित बदलायचा आहे त्यांना आता जास्त वेळ थांबावे लागणार आहे. मोबाईल नंबर अद्ययावत करण्यास होणाऱ्या विलंबामुळे गॅस बुकिंग आणि डिलिव्हरी मेसेज मिळण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. परिणामी हे काम करण्यास वेळ लागत असल्यामुळे ग्राहकांनी गॅस सिलिंडर मिळण्यास देखील विलंब लागू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -