Saturday, May 16, 2026
Homeक्रीडामिचेल मार्शची तडाखेदार खेळी, चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, लखनौकडून हिशोब

मिचेल मार्शची तडाखेदार खेळी, चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, लखनौकडून हिशोब

मिचेल मार्श आणि जॉश इंग्लिस या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 स्पर्धेतील 59 व्या सामन्यात 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. चेन्नईने कार्तिक शर्मा याच्या 71 धावांच्या खेळीच्या जोरावर लखनौसमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. लखनौने हे आव्हान 20 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. लखनौने 3 विकेट्स गमावून 16.4 बॉलमध्ये सामना जिंकला. लखनौचा हा या मोसमातील एकूण चौथा आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा पहिला विजय ठरला. लखनौने या विजयासह चेन्नई विरूद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड केली.

 

सामन्याचा आढावा

लखनौने टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडल्यानंतर चेन्नईने संपूर्ण 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. चेन्नईसाठी कार्तिक शर्मा याने सर्वाधिक 71 धावा केल्या. तर शिवम दुबे याने नाबाद 32 धावांचं योगदान दिल. डेवाल्ड ब्रेव्हीस याने 25 धावा जोडल्या. संजू सॅमसन 20 धावा करुन बाद झाला. तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि प्रशांत वीर या दोघांनी प्रत्येकी 13 धावा जोडल्या. तसेच उर्विल पटेल दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरला. उर्विलने 6 धावा केल्या. लखनौसाठी आकाश सिंह याने 3 विकेट्स मिळवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर शाहबाझ अहमद आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

 

लखनौची झंझावाती सुरुवात

लखनौच्या मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस या सलामी जोडीने झंझावाती सुरुवात करुन पावरप्लेमध्येच सामना आपल्या बाजूने खेचला. मार्श आणि इंग्लिस या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 135 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने लखनौचा विजय निश्चित झाला. मात्र त्यानंतर चेन्नईने लखनौला सलग 2 झटके दिले. जोश इंग्लिस 36 धावा करुन आऊट झाला. तर मार्शला शतकाची संधी होती. मात्र मार्शचं शतक 10 धावांनी हुकलं. मार्शने 38 बॉलमध्ये लखनौसाठी सर्वाधिक 90 रन्स केल्या. मार्शने या खेळीत 7 सिक्स आणि 9 फोर लगावले.

 

लखनौने अब्दुल समद याच्या रुपात तिसरी आणि शेवटची विकेट गमावली. अब्दुलने 7 धावा जोडल्या. तर निकोलस पूरन आणि मुकुल चौधरी या दोघांनी उर्वरित धावा करुन लखनौला विजयी केलं. पूरनने 17 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरसह 32 रन्स केल्या. तर मुकल 13 धावांवर नाबाद राहिला. लखनौने अशाप्रकारे सामना जिंकला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -