Monday, May 18, 2026
Homeक्रीडाकॅप्टन अक्षरची निर्णायक खेळी, दिल्लीचा 5 विकेट्सने विजय, राजस्थान पुन्हा पराभूत

कॅप्टन अक्षरची निर्णायक खेळी, दिल्लीचा 5 विकेट्सने विजय, राजस्थान पुन्हा पराभूत

कॅप्टन अक्षर पटेल याने अखेरच्या क्षणी नाबाद आणि निर्णायक खेळी करुन दिल्ली कॅपिट्ल्सला 5 विकेट्सने विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमकिा बजावली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 62 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्ससमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान होतं. ध्रुव जुरेल आणि रियान पराग या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीसमोर 194 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 5 विकेट्स राखून 4 बॉलआधी पूर्ण केलं. दिल्लीने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 197 धावा केल्या. दिल्लीचा हा या मोसमातील सलग 5 पराभवानंतर पहिला आणि एकूण सहावा विजय ठरला. तसेच राजस्थान या हंगामात दिल्ली विरुद्ध दुसऱ्यांदा अपयशी ठरली. याआधी दिल्लीने राजस्थानवर 1 मे रोजी 7 विकेट्सने विजय मिळवला होता.

 

सामन्यात काय झालं?

दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशी, कॅप्टन रियान पराग आणि ध्रुव जुरेल या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. वैभवने 46, रियानने 51 आणि ध्रुवने 53 धावा केल्या. राजस्थानने या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर 8 विकेट्स गमावून 193 धावा केल्या. तर दिल्लीसाठी मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.

 

दिल्ली कॅपिट्ल्सची बॅटिंग

दिल्लीसाठी विजयी धावांचा पाठलाग करताना अभिषेक पोरेल आणि केएल राहुल या सलामी जोडीने विजयाचा पाया रचला. दोघांनी 105 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक आऊट झाला. अभिषेकने 31 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 7 फोरसह 51 रन्स केल्या. साहिल पारख याने 9 धावा जोडल्या. त्यानंतर केएल राहुल आऊट झाला. केएलने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. केएलने 42 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 56 रन्स जोडल्या. ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलर दोघेही दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचू शकले नाहीत. त्यामुळे दिल्ली अडचणीत सापडली होती. मात्र कॅप्टन अक्षर पटेल आणि आशुतोष शर्मा या दोघांनी निर्णायक भागीदारी केली आणि दिल्ली जिंकवलं.

 

अक्षर आणि आशुतोषची निर्णायक खेळी

अक्षरने 18 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 34 रन्स केल्या. तर आशुतोषने 5 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारसह नाबाद 18 धावा केल्या. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर आणि ब्रिजेश शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर दासुन शनाका याने 1 विकेट मिळवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -