ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या विरोधात २० मे २०२६ रोजी देशभरातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांना बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील विविध रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे टेंशन वाढले आहे. नागपूरमधील रुग्णांना औषधांचा तुटवडा भासू नये आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत राहाव्यात यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध शाखेने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
औषध विक्रेत्यांनी बंदचे आवाहन का केले आहे ऑनलाइन इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसायाविरोधात ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील औषध विक्रेत्यांना २० मे रोजी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभागाने रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. (Organization) यामध्ये औषध विक्रेता संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली असून जनहित लक्षात घेऊन बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोलीतील बनावट नोटांचे नागपूर ‘कनेक्शन’; इंजिनिअर भावंडांसह चौघांना अटक, एटीएममध्ये नोटा जमा करण्याचा प्रयत्न, नागपुरातील फ्लॅटमध्ये बनावट नोटांचा ‘कारखाना’ एफडीएच्या अन्न शाखेने औषध विक्रेत्यांच्या संघटनेशी संपर्क साधला. (Organization) तर जिल्ह्यातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून बंदमध्ये सहभागी होऊ नये, यासाठी सातत्याने विनंती केली जात आहे.
औषध दुकानदारांच्या संघटनेकडून संपाच्या दिवशी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही औषध दुकाने सुरू ठेवण्याबाबत प्रशासनाने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून (Organization) त्यांनी त्यास सहमती दर्शविली आहे.नागपूर जिल्ह्यातील मेडप्लस, अपोलो फार्मसी आणि वेलनेस फॉरएव्हर ही औषध दुकाने नियमितप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.औषधांची तातडीची गरज भासल्यास नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.
संपर्कासाठी कोणते दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध शाखेने तातडीने औषधांची गरज भासल्यास स्वाती भरडे, औषध निरीक्षक – ९८९०८२८१९४, प्रशांत रामटेके, औषध निरीक्षक – ९०२८६७००२४, अभिषेक चवरडोल, औषध निरीक्षक – ८८९७९४०९८१ यांच्या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
अन्न व औषध प्रशासन, नागपूर यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (औषधे) मनिष चौधरी यांनी केले आहे.



