Friday, May 22, 2026
Homeक्रीडागुजरातचा सर्वात मोठा विजय, चेन्नईचा 89 धावांनी पराभव, प्लेऑफमधून पॅकअप

गुजरातचा सर्वात मोठा विजय, चेन्नईचा 89 धावांनी पराभव, प्लेऑफमधून पॅकअप

आयपीएल 2026 स्पर्धेतील 66 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने शुबमन गिल याच्या नेतृत्वात धावांबाबत इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. गुजरातने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी धुव्वा उडवला आहे. शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या त्रिकुटाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 230 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र विजयी धावांचा पाठलाग करताना चेन्नईला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातच्या गोलंदाजांनी चेन्नईवर एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. गुजरातने चेन्नईचं 13.4 ओव्हरमध्ये 140 रन्सवर पॅकअप केलं. गुजरातने यासह 19 व्या मोसमातील आपला नववा विजय मिळवला. गुजरातने यासह या हंगामातील साखळी फेरीचा आपला शेवट विजयाने केला. तर पराभवासह चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान संपुष्ठात आलं.

 

पहिल्या डावाचा धावता आढावा

चेन्नईने टॉस जिंकला कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने गुजरातला बॅटिंगसाठी बोलावलं. गुजरातसाठी साई सुदर्शन याने सलग पाचवं अर्धशतक करण्यासह सर्वाधिक धावा केल्या. साईने 53 बॉलमध्ये 84 रन्स केल्या. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल याने 64 रन्स केल्या. शुबमनने या खेळीत 3 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर जोस बटलर यानेही अर्धशतक ठोकलं. जोसने 27 बॉलमध्ये 211.11 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 57 रन्स केल्या. जोसने या खेळीत 4 सिक्स आणि 5 फोर खेचले. चेन्नईकडून फक्त तिघांनाच प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि स्पेन्सर जॉन्सन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

 

चेन्नईची बॅटिंग

चेन्नईला प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणं बंधनकारक होतं. त्यात चेन्नईला 230 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त अशा सुरुवातीची गरज होती. मात्र संजू सॅमसन डावातील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. संजू आला तसाच परत गेला. मॅथ्यू शॉर्ट आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड या दोघांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र दोघांनी निराशा केली.

 

मॅथ्यूने 24 तर ऋतुराजने 16 रन्स केल्या. उर्विल पटेल यालाही संजूप्रमाणे भोपळा फोडता आला नाही. कार्तिक शर्मा याने 19 आणि डेवाल्ड ब्रेव्हीस याने 8 रन्स केल्या. शिवम दुबे याने फटकेबाजी करुन चेन्नईची विजयाची आशा कायम ठेवली. मात्र शिवमही आऊट झाला. शिवमने चेन्नईसाठी सर्वाधिक धावा केल्या. शिवमने 17 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह 47 रन्स केल्या.

 

अंशुल कंबोज याने 19 धावा जोडल्या. नूर अहमद याने 1 धाव जोडली. स्पेन्सर जॉन्सन हा देखील झिरोवर आऊट झाला. मुकेश चौधरी नाबाद परतला. गुजरातसाठी मोहम्मद सिराज, कगिसो रबाडा आणि राशिद खान या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवत चेन्नईचं पॅकअप करण्यात प्रमुख भूमिका बजावली. गुजरातने अशाप्रकारे सामना जिंकला आणि 2 गुण मिळवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -