मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस असणार आहे. सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीच्या परिसरात मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषणाला बसणार आहेत. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्ट मंडळ भेटल्यावर देखील मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम होते. आज मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या लेखी स्वरूपात मान्य होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज ड्राफ्ट मिळणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जाते.
जरांगे पाटील यांच्या सोबत विस्ताराने चर्चा केली. काही मुद्द्यांची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे. त्याच्यामध्ये त्यांचे काही आक्षेप होते, काही ठिकाणी निष्काळजीपणा दिसतोय मुलांच्या शिक्षणाचा नुकसान होऊ नये. त्यांना जी काही माहिती हवी आहे ती मी देत आहे, उद्या त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे.तशी आवश्यकता वाटली तर मी उद्या त्यांना स्वतः जाऊन भेटेल” असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
आम्ही आशावादी आहोत
“त्यांनी ज्या काही मागण्या मांडल्या होत्या, त्याची सविस्तर माहिती घेऊन आम्ही आमच्या अध्यक्षांना पाठवतोय. त्याने त्यांचं समाधान होत असेल तर ठीक आहे. मात्र त्यांची इच्छा असेल तर आजच्या चर्चेच्या अनुषंगाने मी जाऊन भेटावं तर मी त्यांना जाऊन भेटेल” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. “अधिकारी स्तरावर निष्काळजीपणा होतो, अशी काही उदाहरण त्यांनी मांडली आहेत. एका आठवड्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही एक हेल्पलाइन काढायला सांगितली आहे. सामान्य नागरिकांना त्यांनी हेल्पलाइन नंबरला फोन करायचा. या संदर्भात जिल्हाधिकारी प्रत्येक आठवड्याला याचा आढावा घेणार. तोडगा निघेल असं मला वाटतं, आम्ही आशावादी आहोत” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
ज्यांना नाही घ्यायचे ते नाही घेणार
“जरांगे पाटील यांनी कालच्या चर्चेत राज्यात 58 लाख नोंदी सापडल्याची माहिती दिली. ज्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांची यादी आम्हाला द्या. आम्ही त्या मराठ्यांना सांगू की तुमची नोंद सापडली आहे. ज्यांना घ्यायचे ते प्रमाणपत्र घेतील. ज्यांना नाही घ्यायचे ते नाही घेणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.





