स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या महिन्याभरात दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. ‘पाठराखीण’ आणि ‘सुना येती घरा’. या दोन्ही मालिकांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. यातील ‘पाठराखीण’ मालिका १ जूनपासून सुरू होणार आहे.
स्टार प्रवाहने एक दोन नाही तर तब्बल सहा मालिका आणि २ कार्यक्रमांची घोषणा केलीये. आधी घोषणा केलेल्या ३ मालिका सोडून आणखी ३ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आणि आणखी २ कार्यक्रम आहेत. यात पहिली मालिका ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही आहे. यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची मुख्य भूमिका असणार आहे. यात ‘सारं काही तुझ्यासाठी’ फेम अभिनेत्री दक्षता जोईल आणि अभिनेत्री अमृता धोंगडे देखील असणार आहे. तर दुसरी मालिका ‘
‘मराठी मिडियम’ या मालिकेत अभिनेत्री श्रद्धा पवार मुख्य भूमिकेत असणार आहे.आणि तिसरी मालिका ‘मी कात टाकली’ असणार आहे. मी कात टाकली ही मालिका नागाच्या संकल्पनेवर आधारित असेल. तर यासोबत ‘गणेशोत्सव २०२६ आणि सिद्धार्थ जाधव याचा ‘आता होउदे धिंगाणा’ हे कार्यक्रमही प्रदर्शित होणार आहेत. आता प्रेक्षक या मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सोबतच नवनवीन विषय आणल्याबद्दल स्टार प्रवाहाचं कौतुकही करत आहेत.



