Monday, June 1, 2026
Homeमहाराष्ट्र12 व्या दिवशीही सुसाट कमाई, 'देऊळ बंद २' सिनेमाने कमावले 'इतके' कोटी,...

12 व्या दिवशीही सुसाट कमाई, ‘देऊळ बंद २’ सिनेमाने कमावले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या

‘देऊळ बंद २’ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमाची रिलीजआधीपासूनच चांगली चर्चा होती. ‘देऊळ बंद २’ रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली.

 

त्यामुळेच ‘देऊळ बंद २’च्या कमाईत चांगलीच वाढ होत आहे. ‘देऊळ बंद २’ सिनेमा रिलीज होऊन १२ दिवस झाले आहेत. १२ व्या दिवशीही ‘देऊळ बंद २’च्या कमाईत चांगलीच वाढ झालेली दिसते. जाणून घ्या सविस्तर

 

‘देऊळ बंद २’ची कमाई ५० कोटी पार

 

सैकनिल्कने दिलेल्या अहवालानुसार, ‘देऊळ बंद २’ सिनेमाने सातव्या दिवशी ७ लाखांची कमाई केली आहे. त्यामुळेच ‘देऊळ बंद २’ची एकूण कमाई ५१.९२ कोटी इतकी झाली आहे. याशिवाय ‘देऊळ बंद २’चं नेट कलेक्शन ४४.१२ कोटी इतकं झालं आहे. अशाप्रकारे आगामी दिवसांमध्ये ‘देऊळ बंद २’ची कमाईचे कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकूणच सिनेमाच्या बजेटपेक्षा ‘देऊळ बंद २’ची कमाई नक्कीच चांगली म्हणता येईल.

 

‘देऊळ बंद २’ सिनेमाविषयी

 

वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित या भव्य सिनेमाची निर्मिती कैलास वाणी, सौ. जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, प्रभावी पार्श्वसंगीत आणि भव्य सादरीकरणामुळे हा सिनेमा अधिक उठावदार ठरला आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केले आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनशैलीमुळे सिनेमा अधिक प्रभावी ठरला आहे. सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत झळकले असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -