Tuesday, June 2, 2026
Homeमहाराष्ट्रकर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ६३ टक्क्यांची वाढ होणार

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ६३ टक्क्यांची वाढ होणार

महागाई भत्ता (डीए) हा लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता एप्रिल २०२६ साठीची नवीनतम एआयसीपीआय-आयडब्ल्यू (औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक) आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. यामुळे जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या पुढील सुधारित आढाव्यात सरकार महागाई भत्त्यात ३टक्यांपर्यंत वाढ करू शकते, अशी अपेक्षा वाढलीय.

 

कामगार ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मार्च २०२६ मधील १४९.१ अंकांच्या तुलनेत एप्रिल २०२६ मध्ये एआयसीपीआय-आयडब्ल्यू निर्देशांक १४९.९ अंकांपर्यंत वाढला आहे. औद्योगिक कामगारांसाठीचा महागाईचा दरही ४.२७% वरून ४.४६% पर्यंत वाढलाय. हे सातत्याने वाढणाऱ्या महागाईला दर्शवत असून त्याचा थेट परिणाम महागाई भत्त्याच्या गणनेवर होतो.

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए महागाई भत्ता १२ महिन्याच्या सरासरीच्या आधारावरून ठरवला जातो. AICPI-IW डेटाच्या १२ महिन्यांच्या सरासरीवर आधारित ठरवला जातो. जुलै २०२६ च्या महागाई भत्त्याच्या सुधारणेसाठी जुलै २०२५ ते जून २०२६ या १२ महिन्यांचा सरासरी निर्देशांक विचारात घेतला जाईल. सध्या मे २०२५ ते एप्रिल २०२६ पर्यंतच्या उपलब्ध १२ महिन्यांच्या डेटाची सरासरी १४७.५१ आहे. या सरासरीच्या आधारे, काढण्याता आलेल्या अंदाजानुसार महागाई भत्त्याची पातळी ६२.५१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, ज्याला पुढील पूर्ण संख्येपर्यंत पूर्णांकित करून ६३टक्के मानले जाऊ शकते.

 

दरम्यान केंद्र सरकारनं एप्रलि २०२६ मध्ये २०२६ पासून लागू होणाऱ्या २टक्के महागाई वाढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर महागाई भत्ता ६० टक्क्यांपर्यंत पोहचला होता. जर पुढील सुधारणा झाल्या तर त्यात आणखी ३टक्क्यांची वाढ झाली, तर महागाई भत्ता ६३ टक्क्यांपर्यंत वाढेल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात थेट वाढ होईल.

 

हे आपण उदाहरणाने समजून घेऊ, जर एखाद्या कर्मचारी लेवल-५ वरील असेल आणि त्याचे मूळ वेतन २९,२०० रुपये असेन तर ६० टक्के डीए असेल तर त्याला १७,५२० इतका महागाई भत्ता मिळेल. जर डीए ६३ टक्के झाला तर तो वाढून १८,३९६ रुपये होईल. म्हणजे काय तर कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला साधरण ८७६ रुपये अतिरिक्त मिळतील. तर वर्षाला १०,००० रुपये अतिरिक्त मिळतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -