Homeमहाराष्ट्रसमृद्धीवर भीषण अपघात, कारमधील अख्खं कुटुंब संपलं, चिमुकलीसह पाच जणांवर काळाचा घाला

समृद्धीवर भीषण अपघात, कारमधील अख्खं कुटुंब संपलं, चिमुकलीसह पाच जणांवर काळाचा घाला

समृद्धी महामार्ग झाल्यामुळे राज्यातील दळणवळण खूप सोपे झाले आहे. सामान्यांचे प्रवासाचे अनेक तास वाचले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना समृद्धी महामार्गावरून प्रवास करता येतो. म्हणूनच इप्सित स्थळी लवकर पोहोचायचे असेल तर समृद्धी महामार्गाचा सर्रास वापर केला जातो. परंतु याच समृद्धी महामार्गावर याआधी अनेक भीषण आणि धक्कादायक अपघात झालेले आहेत. वेगात वाहन आल्याने काही वेळा अनेकांचा मृत्यू झाल्याचा घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, आता याच समृद्धी महमार्गावर मन सुन्न करणारी घटना घडली आहे. वॅगनर कारने प्रवास करणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचाच एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. याच अपघातत मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 105 च्या जवळ एक भीषण अपघात झाला आहे. कार ट्रकवर आदळल्याने ही भीषण घटना घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणइ एका मुलीचा समावेश आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या टोलनाका परिसरात ही घटना घडली आहे.

 

चंद्रपूरहून मुंबईत जात होते पाच जण

मिळालेल्या माहितीनुसार वॅगनर कारमद्ये बसून पाच जण चंद्रपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होते. मात्र पवासादरम्यान, या कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की यात कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेता येईल का? यासाठी प्रयत्न केला जात होता. परंतु या अघातात कारमधील पाचही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या पाच जणांच्या कुटुंबीय, नातेवाईकांना बळ मिळो, अशी प्रार्थना केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -