Homeइचलकरंजीहुपरी : पत्नीला पाहून घरी निघाले अन् काळाने गाठले! आई रुग्णालयात, वडिलांचा...

हुपरी : पत्नीला पाहून घरी निघाले अन् काळाने गाठले! आई रुग्णालयात, वडिलांचा अपघातात मृत्यू; चिमुकल्यांचा आक्रोश पाहून डोळे पाणावतील

येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. सरदार मोहन गोसावी (वय ३९ सध्या रा. अंबाईनगर, हुपरी. मूळ गाव निपाणी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी चारच्या सुमारास हुपरी-यळगूड मुख्य रस्त्यावर हॉटेल अपेक्षाजवळ एका बेकरीसमोर घडला.

 

घटनेची वर्दी अमोल सुरेश गोसावी यांनी पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, सरदार गोसावी यांच्या पत्नी छकुली या चार दिवसांपासून येथील गावभागातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. सरदार त्यांच्या सेवेत होते. आज दुपारी त्यांना पाहून आपल्या दुचाकीवरून (क्र. एम एच ५१ ०७४५) ते घरी निघाले होते.

 

दरम्यान, अचानक समोरून आलेल्या संतोष बाळासाहेब पाटील यांच्या दुचाकीने (क्र. एम एच ०८ एफ ए ३३९१) त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतोष पाटील (रा. वाळवेकरनगर हुपरी) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

 

पत्नीला पाहून घरी येतानाच ओढवला मृत्यू

 

सरदार स्क्रॅप व्यावसायिक होते. त्यांनी अलीकडेच येथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्याच्या पत्नी छकुली यांना विजेचा धक्का बसल्याने चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. सरदार त्यांच्या सेवेत होते. पत्नींला पाहून घरी परतत असताना त्यांच्यावर मृत्यू ओढवला. आई रुग्णालयात तर वडिलांचा अपघाती मृत्यू या दुहेरी आघाताने त्यांच्या कोवळ्या मुलांनी तसेच त्यांच्या नातेवाइकांनी आरोग्य केंद्र आवारात मोठा आक्रोश केला. त्यामुळे अनेकांचे हृदय पिळवटून गेले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -