Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाआयपीएलच्या (IPL) नवीन नियमामुळे धोनी २-३ वर्षे सहज खेळू शकतो

आयपीएलच्या (IPL) नवीन नियमामुळे धोनी २-३ वर्षे सहज खेळू शकतो

महेंद्रसिंग धोनी अजून किती वर्षे आयपीएल खेळणार, यावर सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरु आहे. आपण अजून एक वर्ष तरी आयपीएल खेळू शकतो, असे धोनीने सांगितले आहे. पण आयपीएलचा एक नवा नियम असा आहे की ज्यामुळे धोनी सहजपणे २-३ वर्षे खेळू शकतो. Cricket

चेन्नईच्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यानंतर धोनी आता निवृत्ती जाहीर करणार, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण धोनीने यावेळी आपली निवृत्ती जाहीर केली नाही. धोनीने यावेळी सांगितले की, मला देशभरातून भरभरून प्रेम यावेळी मिळालें आहे. प्रत्येक स्टेडियममध्ये लोकांनी मला जे प्रेम दिले आहे, त्याची परतफेड
मला करावी लागेल. त्यामुळे मी आता निवृत्ती घेणार नाही आणि त्यांच्यासाठी अजून एक वर्ष तरी मी खेळेन. त्यामुळे धोनी अजून एक वर्ष पण तरी आयपीएल खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलचा हा जो नवीन नियम आहे त्यामुळे धोनी आता किमान २-३ वर्षे तरी सहजपणे खेळू शकतो. Cricket

आयपीएलमध्ये (IPL) काही नवीन नियम बनवण्यात आले. त्यामध्ये एक नियम आहे तो इम्पॅक्ट खेळाडूचा. या नियमानुसार कोणत्याही एका खेळाडूच्या बदली तुम्ही दुसरा खेळाडू घेऊ शकता. त्यासाठी एका खेळाडूला तुम्हाला संघाबाहेर बसवावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला नवीन खेळाडू संघात घेता येऊ शकतो. जेव्हा यापुढे चेन्नईच्या खेळाडूने मोठी धावसंख्या उभारली तर ते धोनीला विश्रांती देऊ शकतात आणि नव्या कर्णधाराला ते संधी देऊ शकतात. यामुळे दोन गोष्टी चेन्नईच्या साध्य होऊ शकतील. पहिली म्हणजे धोनीला विश्रांती जास्त मिळेल आणि तो जास्त काळ खेळू शकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे धोनी संघात असताना नवीन कर्णधार टीमची मोट बांधू शकतो.

त्यामुळे या नियमामुळे आता धोनी आणि चेन्नई यांचा चांगलाच फायदा होऊ शकतो. आयपीएलच्या या नवीन नियमाचा फायदा आता धोनीला होऊ शकतो आणि तो जास्त काळ आयपीएल ( IPL) खेळू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -