Homeइचलकरंजीलाडकी बहीण अनुदान, रेशनसाठी ३० ऑक्टोबरला मोर्चा

लाडकी बहीण अनुदान, रेशनसाठी ३० ऑक्टोबरला मोर्चा

इचलकरंजी : लाडकी बहीण योजनेचे बंद केलेले अनुदान आणि रेशनवरील धान्य पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाचे शहर सेक्रेटरी कॉ. भरमा कांबळे यांनी ही माहिती दिली.

 

शहरातील सहा हजार रेशन कार्डधारकांचे धान्य बंद झाले असून, हजारो महिलांचे अनुदानही थांबविण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे. बँकांच्या सूचनेनुसार प्राप्तिकर विवरणपत्र भरलेल्या कामगार कुटुंबांवर अन्याय होत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. बंद केलेले अनुदान आणि रेशन धान्य पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करण्यात येणार असून

या मोर्चात बाधित महिला आणि रेशन कार्डधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. कांबळे यांनी केले आहे. बैठकीला कॉ. सदा मलाबादे, भाऊसाहेब कसबे, धनाजी जाधव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -