तारदाळ : तारदाळ येथील अरुणा श्रीकांत हिंगमिरे (वय ४८) यांनी निमशिरगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याने सकाळपासून त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. दुपारनंतर या घटनेची माहिती तारदाळ गावात समजल्यानंतर नातेवाइकांनी शोध घेतला असता मृतदेह अरुणा हिंगमिरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुणा हिंगमिरे यांचे गुरुवारी रात्री घरामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर त्यांनी गोट्याकडे जात असल्याचे सांगून घर सोडले. मात्र, त्या थेट निमशिरगाव रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्या. तेथे रेल्वेखाली उडी घेऊन त्यांनी जीवन संपविले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे या घटनेची माहिती समजल्यानंतर तारदाळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत जयसिंगपूर पोलीस पुढील तपास करत आहेत



