तुम्ही माझ्या कपड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. उर्फी जावेदचं सनी लियोनीला प्रत्युत्तर

सोशल मीडियावर आपल्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर उर्फीला तिच्या कपड्यांमुळे प्रचंड ट्रोल केलं जातं.

नुकत्याच काही दिवसांपूवी लेखक चेतन भगतने देखील उर्फीच्या कपड्यांवर कमेंट केली होती. चेतन भगतच्या त्या वक्तव्याचा उर्फीने देखील चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, आता स्पिलट्सव्हिला 14 मध्ये उर्फीच्या कपड्यांवर कमेंट करण्यात आली आहे. ही कमेंट चक्क सनी लियोनीने केली आहे.

सनी लियोनीला आवडते उर्फीची स्टाईल
स्पिलट्सव्हिला 14 च्या आगामी भागामध्ये उर्फी जावेदने काळ्या रंगाचा जाळीजार ड्रेस घातला आहे. सनी लियोनी उर्फीचा हा ड्रेस पाहून खूप इम्प्रेस झाली आणि तिचं कौतुक करु लागली. यावेळी सनी लियोनी म्हणते की, “उर्फी तुझा आउटफिट जबरदस्त आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरील पोशाख म्हणून परिपूर्ण आहे. मला तुझी कपड्यांची निवड आवडते आणि ते तुला छान दिसतात.”

सनी लियोनीकडून कौतुक ऐकल्यावर उर्फी म्हणते की, ‘मी माझ्या खास कपड्यांमुळे ओळखली जाते. तुम्ही माझ्याशी स्पर्धा करू शकता पण माझ्या कपड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. हे नेहमीच इतरांच्या कल्पने बाहेरचे असते.

उर्फीच्या कपड्यांवर चेतन भगतने केलं होतं वक्तव्य

चेतन भगत ने साहित्य आज तक मध्ये उर्फी जावेदचा उल्लेख केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, आजकालची तरुण पिढी उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर लाईक करण्यात वेळ वाया घालवत आहेत. हे त्यांच्या अभ्यासाचा भाग आहे का? की ते इंटरव्यूमध्ये जाऊन बोलणार की सर मला उर्फी जावेदचे सगळे ड्रेस माहित आहेत. तशी त्या बिचारीची काही चूकी नाही यात ती तर तिचं तिचं करतेय. ती तिचं करिअर करत आहे. एक भारतातील जवान आहेत जे देशाती रक्षा करत आहेत आणि एक आमचे आजकालचे तरुण उर्फी जावेदचे फोटो पाहत आहेत. तर यांचे काय होईल? आज पण मी पाहिलं उर्फीने दोन फोन घातले आहेत.

Join our WhatsApp group