लिओनेल मेस्सीने पुन्हा रचला इतिहास, टीम अर्जेंटीनाची क्वार्टर फानलमध्ये धडक!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष फिफा वर्ल्ड कप 2022 कडे लागले आहे. शनिवारी रात्री फिफा वर्ल्ड कपमध्ये प्री- क्वार्टर फायनलचा दुसरा सामना झाला. या सामन्यामध्ये अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फुटबॉल वर्ल्ड कपच्या क्वार्टर फानलमध्ये धडक घेतली आहे. लिओनेल मेस्सीची टीम अर्जेंटिनाने या अटीतटीच्या सामन्यामध्ये 2-1 असा विजय मिळवला. आता अंतिम-8 मध्ये टीम अर्जेंटिनाचा सामना नेदरलँडसोबत होणार आहे. नेदरलँड्सने प्री-क्वार्टर फायनलमध्ये अमेरिकेचा पराभव केला. 9 डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यात क्वार्टर फानलचा सामना रंगणार आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात टीम अर्जेंटिनाचा कॅप्टन लिओनेल मेस्सी आणि युवा स्टार ज्युलियन अल्वारेझ या दोघांनी जबरदस्त खेळी केली. या दोघांनीही गोल केले. मेस्सीने 35व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल केला. या सामन्यात त्याने इतिहास रचला. हा मेसीच्या करिअरमधील 1000 वा सामना होता. त्याने आपल्या संस्मरणीय सामन्यात गोल करत टीमला विजय मिळवून दिला.

लिओनी मेस्सी हा वर्ल्ड कप इतिहासात सर्वात जास्त गोल करणारा अर्जेंटिनाचा प्लेअर ठरला आहे. त्याने माराडोनाला मागे टाकले आहे. मेस्सीचा वर्ल्ड कप इतिहासातील हा नववा गोल आहे. लिओनेल मेस्सीने त्याच्या करिअरमधील आतापर्यंतच्या 1000 सामन्यांमध्ये 779 गोल आणि 338 असिस्ट केले आहेत. तसेच त्याच्या पाचव्या वर्ल्ड कपमध्ये त्याने नॉकआऊट सामन्यात प्रथमच गोल केला.

Join our WhatsApp group