इचलकरंजी/प्रतिनिधी –
शिवतीर्थ येथे राजमुद्रेच्या खाली बसविलेल्या नरवीर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या शिल्पाचे पुजन नाभिक समाजाच्यावतीने करण्यात आले. शिवतीर्थ परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत असून पहिले शिल्प बसविण्यात आले.
नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा असलेल्या शिवतीर्थ परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शुरांचे शिल्प याठिकाणी बसविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत पहिले शिल्प बसविण्यात आले असून त्यामध्ये नरवीर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे यांचे शिल्पाचा समावेश आहे. ब्राँझ धातूमध्ये हे शिल्प बनविण्यात आले आहेत. शूरवीरांचे शिल्प तयार करत असताना त्यांच्याशी संदर्भात माहिती व त्या काळातील लढाईचे प्रसंग साकारण्यात आले आहेत.
या शिल्पांचे पुजन नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनिल इंगळे, कृष्णात साळुंखे, सयाजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवतीर्थ सुशोभिकरण समितीचे अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. त्यांनी शिल्प तयार करत असताना इतिहास तज्ञांची कशी मदत झाली, कोण कोणत्या गोष्टींचा संदर्भ व विचार करण्यात आला याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी विनायक चव्हाण, रविंद्र क्षिरसागर, मारुती काशिद, हिंदुराव राऊत, बाबुराव जाधव, अमोल कदम, जयसिंग सकपाळ, भारत मर्दाने, बाळासाहेब पोवार, सागर शिंदे, जनार्दन सुर्यवंशी, प्रमोद शिंगे, अरुण शिंगे, गणेश टिपुगडे, प्रकाश जाधव, सुरेश कांबळे, संतोष म्हेत्रे, बापू सपकाळ, अमोल सपकाळ, मारुती बने, सचिन व्हन्ने आदी उपस्थित होते. आभार अरुण काशिद यांनी मानले.