निष्पाप मुलीची हत्या करणाऱ्या सावत्र बाप युवराज साळुंखे याचे वकीलपत्र घेऊ नये यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने बार असोसिएशनला दिले निवेदन



ताजी बातमी /ऑनलाइन टीम

 इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या यळगुड गावातील निष्पाप प्रणाली हीची हत्या करणाऱ्या  नराधम युवराज साळुंखे  या नराधम सावत्र बापाचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये कारण कोणतेही वकील वकीलपत्र घेत नसल्याने तिथे कारागृहातच राहतील व समाज सुरक्षित राहील तसेच अशी कृत्ये करणाऱ्या अपराध्याच्या मध्ये एक भीती व अशा घटनांना आळा बसेल.

असे नराधम चिमुकल्यांच्या सध्या जीवावर उठले आहेत अशी कोणती घटना परत होऊ नये यासाठी सावत्र बापाने निर्घुणपणे प्रणालीची पंचगंगा नदी मध्ये बुडून हत्या केली व पोलिसात जाऊन बनाव केला.त्यामुळे याचे वकीलपत्र कोणी घेऊ नये यासाठी आज शहरातील वकील बर असोसिएशन युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन यावेळी पदाधिकारी श्याम आठवले, कुमार पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group