Friday, March 29, 2024
Homeक्रीडाMumbai Indians च्या टीममध्ये पोलार्ड, पंड्यापेक्षा धोकादायक खेळाडूची एंट्री, जिंकवून देईल 6...

Mumbai Indians च्या टीममध्ये पोलार्ड, पंड्यापेक्षा धोकादायक खेळाडूची एंट्री, जिंकवून देईल 6 वी IPL ट्रॉफी

कायरन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केलीय. हार्दिक पंड्या आयपीएल 2021 पर्यत मुंबई इंडियन्सचा प्राण होता.आता तो गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. हे दोन खेळाडू नसल्याने मुंबई इंडियन्सची फलंजाजी थोडी कमकुवत झालीय. अशावेळी एक स्फोटक फलंदाज मुंबई इंडियन्सच्या टीमचा ताकत वाढवू शकतो. त्याने सरस खेळ दाखवला, तर मुंबई इंडियन्ससाठी IPL 2023 ची ट्रॉफी जिंकणं कठीण काम नसेल.

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये एका धोकादायक खेळाडूची एंट्री झाली आहे. तो कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्यापेक्षा पण धोकादायक आहे. त्याच्या समावेशामुळे मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएलच जेतेपद पटकावण्याची शक्यता कैकपटीने वाढली आहे.

कशासाठी ओळखला जातो?

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 च्या सीजनसाठी ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनला विकत घेतलय. त्यासाठी मुंबई इंडियन्सने 17.25 कोटी रुपये मोजलेत. ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील विक्री झालेला दुसरा महागडा खेळाडू आहे. स्फोटक बॅटिंग आणि घातक गोलंदाजीसाठी कॅमरुन ग्रीन प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाची टीम तीन सामन्यांची T20 सीरीज खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कॅमरुन ग्रीनने आपल्या स्फोटक बॅटिंगची प्रचिती दिली होती.

भारताता त्याचा परफॉर्मन्स कसा आहे?

भारतात मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियन टीमने 20 सप्टेंबर 2022 रोजी पहिला टी 20 सामना खेळला. त्या मॅचमध्ये कॅमरुन ग्रीनने 30 चेंडूत 61 धावा फटकावल्या. यात 8 चौकार आणि 4 षटकार होते. या मॅचमध्ये ग्रीनने एक विकेटही काढला. 25 सप्टेंबरला हैदराबादला झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 21 चेंडूत 52 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 3 षटकार होते.भारतीय पीचेसवर ग्रीनच रौद्र रुप पाहिल्यानंतर सर्वच आयपीएल टीम्समध्ये ग्रीनला विकत घेण्यासाठी चढाओढ लागली होती. मुंबई इंडियन्सने मिनी ऑक्शनमध्ये बाजी मारली. त्यांनी 17.25 कोटी रुपये मोजून ग्रीनला विकत घेतलं.

IPL 2023 चे टॉप 3 महागडे खेळाडू
सॅम कुरेन (इंग्लंड) – 18.50 कोटी, पंजाब किंग्स

कॅमरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया) – 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स

बेन स्टोक्स (इंग्लंड) – 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्स

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -