भारताचा माजी कर्णधार आणि रनमशिन विराट कोहली त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असतो.विराट कोहली दही, दूधाचे पदार्थ किंवा गव्हाच्या पीठाची चपाती खात नाही.
विराट त्याच्या डाएटमध्ये ग्लुटेन आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन करत नाही. शरीर फॅट फ्री होण्यास यामुळे मदत होते. विराट कोहली यासाठी वेगळ्या पदार्थांच्या पीठाची भाकरी खातो.
सामान्य भाताऐवजी तो फ्लॉवरचा भात खातो. फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये खास पद्धतीने हे तांदूळ तयार करण्यात येतं. ग्लुटेनमुक्त आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असलेल्या या तांदळाची चवही सामान्य असते. या फुलकोबी तांदळाची किंमत ४०० ते ५०० रुपये प्रति किलो इतकी आहे.एका मुलाखतीत विराटने सांगितले होते की, फिटनेससाठी अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागली. यात दुग्धजन्य पदार्थ खाणं पूर्ण बंद केलं. तसंच ग्लुटेन टाळण्यासाठी गव्हापासून तयार केलेलं ब्रेडही खात नाही.