Thursday, March 28, 2024
Homeकोल्हापूरफार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय, तीन महिलांची केली सुटका; कोल्हापूर पोलिसांनी म्हाळुंगेत मध्यरात्री...

फार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय, तीन महिलांची केली सुटका; कोल्हापूर पोलिसांनी म्हाळुंगेत मध्यरात्री टाकला छापा

पन्हाळ्याच्या पायथ्याशी मसाई पठारकडे जाताना म्हाळुंगे गावातील एका फार्म हाऊसवर कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला.यावेळी वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या तीन महिलांची सुटका करत फार्म हाऊसच्या चालकासह तिघांना ताब्यात घेतले.

फार्म हाऊस चालक सुरज विश्वास वरेकर (रा.म्हाळुंगे), प्रसाद आनंदा वरेकर (म्हाळुंगे) आणि रविंद्र पांडुरंग कर्ले (रा.वडणगे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर ताब्यात घेतलेल्या संबंधित महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहिती नुसार, म्हाळुंगे गावातील एका फार्म हाऊसवर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. फार्म हाऊस चालक सुरज विश्वास वरेकर हा मध्यस्थी रविंद्र पांडुरंग कर्ले (रा.वडणगे) याचे मार्फत काही महिलांना याठिकाणी वेश्याव्यवसायासाठी आणत होता. यामाहितीवरुन पोलिसांनी यापूर्वी याठिकाणी दोन वेळा छापा टाकला होता. मात्र कारवाईदरम्यान काहीच आढळून आले नव्हते.

दरम्यान, आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापूर पोलीस विभागातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे आनंदराव सोपान पाटील यांच्यासह पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तीन महिला आढळून आल्या. पोलिसांनी या तीन महिलांसह रविंद्र कर्ले, सुरज वरेकर, प्रसाद वरेकर या तिघांना अटक केली. तर महिलांना सुधारगृहात पाठवल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले. आरोपी कडून मोबाईल फोन व एक जुनी मारुती गाडी सह रोख रक्कम मिळुन १ लाख ६७ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -