Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाWTC Final 2023 : यशस्वी भव: WTC Final साठी यशस्वी जयस्वालला भारतीय...

WTC Final 2023 : यशस्वी भव: WTC Final साठी यशस्वी जयस्वालला भारतीय संघात संधी

WTC Final 2023 : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालचं (Yashasvi Jaiswal) नशीब फळफळलं आहे. यशस्वी जयस्वालची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी (WTCFinal) साठी भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागली आहे. टीम इंडियामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वालची निवड करण्यात आली आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये 7 जून 2023 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


India’s squad for WTC final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

Standby Players :
ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -