राज्यात लसीची टंचाई; तीन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक’

ताजी बातमी ऑनलाइन टीम

राज्यात लसीची खूपच टंचाई जाणवत आहे. दोन-तीन दिवस पुरतील इतकेच डोस शिल्लक आहेत. लसीअभावी लहान मुलांचे लसीकरण रेंगाळले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लसीचा पुरेसा साठा पुरविण्याची मागणी पंतप्रधानांच्या बैठकीत केली असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्याला कोव्हॅक्सिनचे साडेसहा लाख डोस मिळाले आहेत. ते मुंबईत आलेले आहेत. या लसीचे राज्यात वाटप केले जाणार आहे. अजूनही लसीची आवश्यकता आहे. आता 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच हा साठा आहे. मुंबईत लहान मुलांच्या लसीकरणाची गती मंदावलेली आहे.

10 दिवसांत फक्त 12 टक्के लसीकरण झालेले आहे. राज्यभरात मात्र लहान मुलांचे 40 टक्के लसीकरण झाले आहे. अशीच गती राहिल्यास 15 दिवसांत त्यांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी माहिती टेपे यांनी दिली.

Open chat
Join our WhatsApp group