कोल्हापुरात झाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची आढावा बैठक

ताजी बातमी/ऑनलाइन टीम
इचलकरंजी –
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक शाहू सांस्कृतिक हॉल येथे पार पडली. या बैठकीत इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नितीन जांभळे यांनी केलेले जोरदार शक्तीप्रदर्शन आणि त्यांना पाठबळ दिलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून  नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह उपस्थित सर्वच नेत्यांनी कौतुक केले.


जिल्ह्याचे नेते कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संध्याताई कुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्ष संघटनेचा विस्तृत आढावा घेण्यात आला.


इचलकरंजी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नितीन अशोकराव जांभळे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तब्बल 80 वाहनांचा ताफा आणि 700 पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ते बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी नामदार हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आक्रमक होण्याचे आवाहन करताना आगामी निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वबळावर लढण्यास सज्ज व्हा. या निवडणूकांमध्ये रुणांना संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले.
नितीन जांभळे यांनी, इचलकरंजी विधानसभा अंतर्गत पक्षाच्या विविध सेलच्या सर्वच निवडी पूर्ण झाल्या असून पुढील काळात पक्ष आणि मुश्रीफसाहेब सांगतील तो आदेश प्रामाणिकपणे पूर्ण केला जाईल. नगरपरिषदेची आगामी निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढून यश खेचून आणेल अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

Join our WhatsApp group