Friday, April 19, 2024
Homeक्रीडाAsaduddin Owaisi: माझ्या गाडीवर गोळीबार, 4 राऊंड फायर! 3-4 लोक हल्ला करून...

Asaduddin Owaisi: माझ्या गाडीवर गोळीबार, 4 राऊंड फायर! 3-4 लोक हल्ला करून पळून गेले

ताजी बातमी ऑनलाइन टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख प्रमुख असुदिन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे.त्यांच्या गाडीवर तीन-चार राऊंड फायर झाले. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीच ट्विट करून गाडीवर गोळीबार झाल्याचा दावा केला आहे.

ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार झाला. 4 राऊंड फायर झाले. 3-4 लोक होते, सर्वच्या सर्व शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तेथून निघून गेलो. आम्ही सर्व जण सुरक्षित आहोत. अलहमदू लिलाह.’

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -