ताजी बातमी/ऑनलाइन टीम.
इचलकरंजी/प्रतिनिधी –
येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबल क्लब व आर. सी. सी. क्लब ऑफ ईस्ट मँचेस्टर यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न डिस्ट्रीस्ट कॉन्फरन्स निमित्त प्रकाशित स्मरणिकेचे लोकार्पण नुकतेच आर. सी. सी. क्लबच्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे हस्ते करण्यातत आले.
मागील महिन्यामध्ये शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी व इंजिनियरींग कॉलेजमध्ये राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे व रोटरीचे प्रांतपाल संग्राम पाटील तसेच मान्यवरांचे उपस्थितीत प्रोबस व आरसीसी क्लबच्या डिस्ट्रीक्ट कॉन्फरन्सची स्मरणिका समारंभपुर्वक संबंधितांना वितरीत केली होती.
त्यावेळी प्रोबस क्लब व आर. सी. सी. क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी या स्मरणिकेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रारंभी स्मरणिका समितीचे अध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांनी सविस्तर माहिती विषद करुन माजी अध्यक्ष बाळासाहेब देवनाळ, कॉन्फरन्स कमिटीचे गजाननराव सुलतानपूरे ,निधी कमिटीचे एम.के. कांबळे, प्रकाशराव दत्तवाडे अनेक साहित्यिक, लेखक यांचेसह सर्व कमिटीच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे अॅड. विश्वासराव चुडमुंगे, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी सौ. मनाली मुनोत, रोटरी सेंट्रलचे यतीराज भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. ‘विसावा’ या स्मरणिकेच्या लोकार्पण सोहळ्यात प्रोबसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब देवनाळ, विद्यमान अध्यक्ष विलासराव पाडळे, पुंडलिकभाऊ जाधव, अॅड. डि. डी. पाटील, महेश झंवर, अरुण पाटील, गजानन शिरगूरे, आप्पासाहेब कुडचे, डॉ. कुबेर मगदुम, प्रदिप लडगे, सुर्यकांत बिडकर, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. रेखा लाटणे, सौ. शालिनी जगदाळे, सौ. सुरेखा मगदुम, सौ. हेमा सोगाणी, सौ. आशा पाटील, सौ. प्रमोदिनी देशमाने, सौ. वसुंधरा कुडचे, मनोहर कुराडे, प्रकाशराव अकिवाटे, विजय बनसोडे, प्रकाश जगताप, दिलीप भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.