इचलकरंजीत कार्गो व पॅसेंजर इलेक्ट्रिक रिक्षाचे शोरूम सुरू

ताजी बातमी/ऑनलाइन टीम. कायनेटीक ग्रीनच्या माध्यमातून इलेक्ट्रो मोटर्स ने इचलकरंजीत थोरात चौक येथे शहरातील पहिलेच कार्गो व पॅसेंजर इलेक्ट्रिक रिक्षांचे शोरुम सुरु केले आहे. या शोरुमचे उद्घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.


वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या अन् त्यातून निर्माण होणार्या प्रदूषणाच्या समस्या हे एक दुष्टचक्र आहे. या दुष्टचक्रामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे.

या सार्यावर ठोस उपाय म्हणून केंद्र सरकारने शून्य प्रदूषण करणार्या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याच अनुषंगाने सर्वसामान्यांना वाहतुकीचा हरित पर्याय उपलब्ध करून देणे या ध्येयाने कायनेटिक ग्रीन ने इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणली आहे. इलेक्ट्रो मोटर्सने इचलकरंजीकरांसाठी ही वाहने उपलब्ध करुन दिली असून यामध्ये प्रदुषण न करणार्या इलेक्ट्रिक कार्गो व पॅसेंजर रिक्षांचा समावेश आहे.

पॅसेंजर रिक्षासाठी प्रतिकिलोमीटर 50 पैसे तर कार्गोसाठी प्रतिकिलोमीटर 70 पैसे इतका खर्च आहे. पॅसेंजर रिक्षा ही चारसीटर असून कार्गोची क्षमता 800 किलोपर्यंत आहे. रोहित आवाडे, शिवम अग्रवाल, रुपेश मुंदडा आणि श्रीराम काबरा यांनी इलेक्ट्रो मोटर्सच्या माध्यमातून शहरात प्रथमच इलेक्ट्रिक रिक्षा उपलब्ध करुन दिल्या आहेत. विविध आकर्षक मॉडेल्स व रंगात या रिक्षा उपलब्ध आहेत. या वाहनांमध्ये भविष्यातील लक्षणीय तंत्रज्ञानांचा समावेश करण्यात आला असून ग्राहकांना विश्‍वासार्ह, परवडणारी, सुरक्षित सेवा देण्याची क्षमता आहे.


स्वागत उत्तम आवडे, अरुणकुमार अग्रवाल, सत्यनारायण काबरा, कैलाश मुंदडा यांनी केले. याप्रसंगी आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, उत्तम आवाडे, सना आवाडे, रफिक खानापुरे, सौ. किशोरी आवाडे, सौ. सपना आवाडे, रवि आवाडे, प्रकाश लोखंडे, संतोष जाधव, मन्सुर सावनुरकर आदींसह विविध मान्यवर व वाहनधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Join our WhatsApp group