Friday, November 22, 2024
Homenewsरशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका; खाद्यतेलाच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांची वाढ

रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका; खाद्यतेलाच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांची वाढ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

होळीपूर्वीच महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले असून, प्रति बॅरल 118 डॉलरवर पोहोचले आहेत. दरम्यान दुसरीकडे खाद्यतेलाच्या दरात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये खाद्य तेलाच्या किमती प्रति लिटर मागे 20 ते 25 रुपयांनी वाढल्या आहेत. सोयाबीन, सुर्यफूल, शेंगदाना अशा सर्वच तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मोहरीच्या तेलाने तर दोनशे रुपयांचा टप्पा पार कला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तेलाची पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने येणाऱ्या काळात तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



भारतात सरासरी 65 टक्के तेलाची आयात केली जाते. पाम ऑईल आपण इंडोनेशियाकडून आयात करतो. जवळपास साठ टक्के पाम ऑईल एकटा इंडोनेशिया भारताला पुरवतो. तर सुर्यफूल तेल आपण रशिया आणि युक्रेनकडून आयात करतो. यातील जवळपास सत्तर टक्के सुर्यफूल तेलाची आयात आपण युक्रेनकडून करतो. तर वीस टक्के सुर्यफूल तेलाचा पुरवठा आपल्याला रशियाकडून होतो. तर दहा टक्के तेल आपण आर्जेंटिनाकडून आयात करतो. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तेलाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. तेलाचा पुरवठा होत नसल्याने तेलाचे दर वाढले आहेत. येत्या काळात तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.


तेलाचे दर वाढल्यास केवळ त्याचा परिणाम हा किचनमधील बजेटवर होणार नाही, तर हॉटेलमधील अन्न पदार्थ तसेच आइसक्रीम खाने देखील महागणार आहे. कारण आइसक्रीमच्या उत्पादनामध्ये मोठ्याप्रमाणात वनस्पती तेलाचा उपयोग होतो. तेल महाग झाल्याने आता सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -