किंमतीत मोठी वाढ झाल्यानंतर आज सोन्याचा दर 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.45 टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात 0.54 टक्क्यांची वाढ होत आहे. सोन्याच्या वाढत्या दराने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये, MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती.
Russia Ukraine War : कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार
एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.45 टक्क्यांनी वाढून 52,005 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचे दर 0.54 टक्क्यांनी वाढले आहेत. आज 1 किलो चांदीचा भाव 68,270 रुपये आहे.