Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगकोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळासह पावसाची शक्यता

कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळासह पावसाची शक्यता

मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात उष्णतेची लाट  कायम आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. अजून काही दिवस उकाडा जाणवेल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे सकाळी दहानंतर प्रचंड ऊन असतं. दोन दिवसानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असानी चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. समजा असानी चक्रीवादळ निर्माण झाल्यास मच्छिमारांना इतर राज्यांच्या जवळपासच्या भागात निवारा आणि सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता भासू शकते. या करीता वादळी हवामानामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाण व इतर किनारपट्टीवरील राज्यातील मच्छिमारांना निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांनी जाहीर केली आहे.

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ; इंधनाचे नवे दर जारी

दोन दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे असानी चक्रीवादळ निर्माण होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकल्यानंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हवेचा वेग देखील वाढणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात असणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. या वादळाचा फटका अनेक राज्यांना बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वादळी हवामानामुळे जहाजांना सुरक्षित ठिकाण व इतर किनारपट्टीवरील राज्यातील मच्छिमारांना निवारा देण्यासाठी आवश्यक सूचना सर्व मच्छीमारांना पोहचवण्यात आल्या आहेत.

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र 21 मार्चपर्यंत हळूहळू चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकून बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर 18-21 मार्च दरम्यान अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. परंतु ही प्रणाली बांगलादेशच्या जवळ आल्याने त्याचा प्रभाव पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्येही जाणवेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -